ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कमी व्होल्टेजमुळे आठ दिवसांपासून संतनगरीचा पाणीपुरवठा बंद

सणासुदीच्या दिवसात महिलांची पाण्यासाठी भटकंती, शेतकरी पित आहेत नाल्यातील "चुव्या"चे पाणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

शेतातील धान मरत असल्याने दुष्काळी परिस्थितीत जॅकवेल च्या आजूबाजूचे शेतकरी सतत मोटार चालू ठेवत असल्यामुळे पाणीपुरवठा योजनेला वोल्टेज कमी पडत असून, मोटार बंद पडून आठ दिवसांपासून ऐन सणासुदीच्या दिवसात पाणीपुरवठा बंद झाल्याने महिलांवर भटकंतीची पाळी आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नाल्यातील दूषित पाणी प्यावे लागत आहे.

जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत संतनगरी धाबा ची पाणीपुरवठा योजना येते. धाबा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चार ते पाच गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सकमूरलगच्या वर्धा नदीवरील जॅक वेल” ला लावलेली मोटार कमी वोल्टेजमुळे पाणी उपसा करू शकत नसल्यामुळे पाणीसाठा करणारी टाकी भरून पाणीसाठा शुद्धीकरणासाठी उपलब्ध होत नसल्याने आठ दिवसांपासून संत नगरीचा पाणीपुरवठा बंद आहे.

वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता जयस्वाल मॅडम यांनी याबाबत कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे नवरात्री सारख्या सणात उपवास पकडलेल्या महिलांना सुद्धा पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे. शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी दैनावस्था झाली आहे. त्यांना नाल्यात विहिरे बनवून तेथील दूषित पाणी पिण्याकरता वापरावे लागत आहे. याकरिता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा व वीज वितरण कार्यालय धा बा तसेच ग्रामपंचायत धाबा जबाबदार असून सणासुदीच्या दिवसात पाण्यासाठी होत असलेली धावपळ नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारी आहे

*लाईनमन म्हणतो व्होल्टेज “बरोबर” मिस्त्री म्हणतो “नाही”* 

 व्होल्टेज कमी पडल्याने मोटार बंद पडल्याबरोबर वीज वितरण कार्यालयाचे दोन लाईनमेन सकमुर जवळच्या वर्धा नदीवरील जाकवेलच्या मोटारीचा वोल्टेज तपासायला गेले. कशाने वोल्टेज मोजमाप केला, माहीत नाही. ते म्हणतात मोटार चालवण्यासाठी पुरेसा व्होल्टेज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाठवलेला मिस्त्री म्हणतो, मोटार चालू केली तर कमी वोल्टेजमुळे जळू शकते? कोण खरे बोलते, कोण खोटं बोलते, हे कळायला मार्ग नाही. महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि ग्रामीण पुरवठाच्या उपअभियंता यांनी प्रत्यक्ष मोक्यावर उपस्थित राहून केली तर फार बरे होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये