ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकारांच्या हक्कासाठी उद्यापासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे लाक्षणिक उपोषण

राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागी ; नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार

चांदा ब्लास्ट

नागपूर : पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळावी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्यात यावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० घरांची निर्मिती करण्यात यावी, दहा वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, यासह विविध १५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी “व्हॉईस आॕफ मीडिया” च्या वतीने उद्या बुधवार १३ डिसेंबरपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम मध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असुन या लाक्षणिक उपोषणात “व्हॉईस ऑफ मीडिया” चे राज्यातील शेकडो पत्रकार सहभागी होणार आहेत.

१८ आणि १९ नोव्हेंबर रोजी बारामती येथे “व्हॉईस आॕफ मीडिया” चे राज्य शिखर अधिवेशन पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडले. सामाजिक बांधिलकी जोपासून विविध प्रसार माध्यमांत पत्रकारीता करणारे पत्रकार अलीकडे अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे समस्याग्रस्त पत्रकारांना शासनाकडून न्याय मिळावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या १५ विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आले. या ठरावांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या उद्या १३ डिसेंबरपासून धंतोली मधील यशवंत स्टेडियम येथे “व्हॉईस आॕफ मीडिया” चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय कार्यकारीणी पदाधिकारी यांचे मार्गदर्शनात पत्रकार हल्लाविरोधी समितीचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन, व्हॉईस आॕफ मीडिया वर्धा जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, देवळी तालुकाध्यक्ष गणेश शेंडे, सेलु तालुकाध्यक्ष सचिन धानकुटे, किरण राऊत, मंगेश काळे, अनिल वांदीले यांचेसह व्हाॕईस आॕफ मीडियाचे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पदाधिकारी लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन दररोज लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. उद्यापासुन सुरू होणाऱ्या लाक्षणिक उपोषणापुर्वी पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी “व्हॉईस आॕफ मीडिया” च्या वतीने दोन वेळा तालुका व जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले, परंतु शासनाकडून पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी हिवाळी अधिवेशनात पत्रकार एकतेचे चित्र शासन आणि समाजासमोर दाखविण्याचा निर्धार केला आहे. उद्यापासुन सुरू होणाऱ्या लाक्षनिक उपोषणात राज्यातील सर्व पञकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन “व्हॉईस आॕफ मीडिया” चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य समन्वयक सुनिल कुहीकर, राज्य संघटक आनंद आंबेकर आणि विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी संयुक्तरित्या केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये