ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला मिळाली कौतुकाची थाप..

नगरपंचायत शिक्षण व क्रीडा समितीतर्फे शिक्षक दिनानिमित्त सत्कार; संविधानाचे पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगरपंचायत शिक्षण व क्रीडा समितीच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ, संविधानाचे पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले

कार्यक्रमाचे उद्‌घाटिका नगर पंचायत पोंभुर्णा येथील नगराध्यक्षा सुलभा गुरुदास पिपरे यांच्या हस्ते झाले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती श्री लक्ष्मण कोडापे होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक मुख्याधिकारी श्री निखिल लांडगे तसेच विरोधी पक्षनेते श्री आशिष कावटवार, तसेच महिला बाल कल्याण उपसभापती उषा गोरंतवार, नगरसेविका रोहिणी ढोले, शारदा गुरुनुले, रीना उराडे, नगर सेविका श्वेता वनकर नगरसेवक अभिषेक बद्दलवार श्री महेश रणदिवे, गणेश वासलवार

व सौ. रुपाली पवन चांदेकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षणातून वैयक्तिक प्रगती साधतानाच विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी जपावी, असे आवाहन करण्यात आले. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांची मेहनत आणि जिद्द यामुळे यशाचे शिखर गाठता येते, असेही मान्यवरांनी मनोगतातून सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन लिपिक रोशन येमूलवार यांनी केले, तर आभार लिपिक वासुदेव मडावी यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… यावेळी नगर पंचायत पोंभुर्णा येथील नगरसेविका/ शिक्षिका सौ. रोहिणीताई ढोले यांचा सुद्धा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये