ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वक्तृत्व स्पर्धेत महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाची कु. अष्टमी मुंढे प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुकास्तरीय ज्युनिअर कॉलेज व सीनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दि. २०/१२/२०२३ सकाळी नऊ वाजता सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर या ठिकाणी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.

प्रत्येक महाविद्यालयातील उत्कृष्ट तीन स्पर्धकांना या ठिकाणी सहभागी होण्यासाठी सूचना देण्यात आली होती. गडचांदूर येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील कु. अष्टमी तिरुपती मुंडे या बीएस्सी भाग एक च्या विद्यार्थिनीचा वक्तृक्त स्पर्धेत जल जीवन मिशन विषयावर उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे प्रथम क्रमांक आला. पंचायत समिती कोरपना तर्फे गौरव करून प्रमाणपत्र बहाल केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश देव, विभागाचे समन्वयक श्री पवन चटारे, सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले असून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये