ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपणा येथे ७ सप्टेंबरला भव्य रक्षाबंधन कार्यक्रम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त कोरपणा येथे भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांना औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरपणा येथे हा कार्यक्रम होणार आहे. बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामुळे कोरपणा परिसरात रक्षाबंधनाचा उत्साह आणखी वाढणार असून, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेशही दिला जाणार आहे.



