भद्रावती येथे ‘सायबर सुरक्षा आणि पोक्सो’ विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
रोटरी क्लब ऑफ भद्रावती, इनर व्हील क्लब ऑफ भद्रावती ब्लॉसम आणि चंद्रपूर पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज, ३ सप्टेंबर २०२६ रोजी भद्रावती येथील राजमणी गार्डन येथे ‘STEPS’ (सुरक्षा, विश्वास, शिक्षण, संरक्षण आणि मर्यादा) या संकल्पनेअंतर्गत ‘सायबर सुरक्षा आणि पोक्सो (POCSO)’ या विषयावर भव्य जनजागृती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री सुनील गाडे साहेब होते. त्यांनी उपस्थितांना सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची मदत कशी घ्यावी, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच सन्माननीय अतिथी म्हणून भद्रावती पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी (BEO) डॉ. प्रकाश महाकाळकर, भरोसा सेल चंद्रपूरच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्रीमती प्रज्ञा वाडेकर आणि सायबर पोलीस स्टेशनचे श्री. कार्तिक खणके यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण (POCSO) आणि इंटरनेटच्या सुरक्षित वापराविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ भद्रावतीचे अध्यक्ष सुधीर पारधी, सचिव सुरेंद्र राऊत, कोषाध्यक्ष महेंद्र गावंडे, प्रोजेक्ट सचिव प्रकाश पिंपळकर, पास्ट प्रेसिडेंट आणि प्रोजेक्ट डायरेक्टर अनिल धानोरकर व डॉ. माला प्रेमचंद, युवराज धानोरकर,तसेच इनर व्हील क्लब ऑफ भद्रावती ब्लॉसमच्या अध्यक्षा वर्षा धानोरकर, सचिव स्वाती चारी, कोषाध्यक्ष स्वरूपा पाटील आणि प्रोजेक्ट डायरेक्टर्स तृप्ती हिरादेवे, शुभांगी बोरकुटे व प्रियंका कुंभारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन पाहिले.
या जनजागृती कार्यशाळेला रोटरी क्लबचे किशोर भोस्कर, किशोर खंडाळकर,विक्रांत बिसेन, आत्माराम देशमुख, रुखसाना शेख, दिलीप राम, मनोहर नागपुरे, मेजर मारुती महातळे, डॉ.हटवार सर , सुनिता खंडाळकर तसेचइनर व्हील ब्लॉसम सदस्य कविता सुफी, मनिषा उचाडे, प्रतिभा मानकर, महिला पोलिस,नागरिकांचा, पालकांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला



