ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा.डॉ. संजय गोरे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन व सिनेट सदस्य तथा गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक व व राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार 2025-26 हा जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना हा पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी पुणे येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ.संजय गोरे हे 2012 पासून विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणावर कार्यरत असून त्यांची 10 पुस्तके व त्यांच्या मार्गदर्शनाखाली 11 विद्यार्थ्यांना phd प्राप्त झालेली आहे. त्यांचे विविध संशोधन पत्रिकेत 77 लेख प्रकाशित झाले असून त्यांचा 100 च्या वर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग आहे. त्यांना या आधी गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तथा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या सर्व समित्यांवर अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केले असून गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेज आणि युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांच्या गव्हर्नमेंट बॉडी वर कार्यरत आहे.

डॉ संजय गोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये