उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत २५ नवयुवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
चिमूर तालुक्यात भगव्याची ताकद वाढली : युवा शक्तीच्या जोरावर शिवसेना संघटना अधिक मजबूत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर ठाम विश्वास व्यक्त करत, माजी खासदार तथा पक्ष सचिव विनायक राऊत साहेब, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम आणि जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चिमूर तालुकाप्रमुख वैभव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २५ नवयुवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, आंबोली चौरस्ता येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर ताजने, उपजिल्हाप्रमुख अमित आखाडे, विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते, चिमूर तालुकाप्रमुख वैभव ठाकरे, माजी तालुकाप्रमुख सुधाकर निवटे, चिमूर तालुका संघटक केवलसिंग जुनी, तालुका समन्वयक बंडू पिसे, उपतालुका प्रमुख गोलू गेडाम, राजेंद्र जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी काळातील पक्ष संघटन मजबूत करणे, युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि गावागावात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करणे याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये मारोती महादेव मसराम, बादल मंडल, राहुल क्षीरसागर, विक्की लहाने, गोलू मसराम, शुभम माळवे, सुरज धुर्वे, अमित जांभुळे, आशिष ठाकरे, रोहित बोभाटे, प्रफुल देशकर, महेश तुकडू ठाकरे आणि लोकेश मुरकुटे यांचा समावेश आहे.
२५ नवयुवकांच्या पक्षप्रवेशामुळे चिमूर तालुक्यात शिवसेनेच्या युवा संघटनेला नवे बळ मिळाले असून, तरुणाईच्या ताकदीच्या जोरावर गावागावात भगवा अधिक जोमाने फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर, नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेनेत वाढत असलेला तरुणांचा सहभाग हा चिमूर तालुक्यातील संघटनेला मिळणाऱ्या नव्या ऊर्जेचे प्रतीक ठरत आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक गावात शिवसेनेची संघटना मजबूत करून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी केले, तर प्रास्ताविक चिमूर तालुकाप्रमुख वैभव ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत नागपुरे, प्रफुल देशकर, मारोती मसराम, समीर बल्की आणि शुभम माळवे यांनी अथक परिश्रम घेतले.
तरुणाईचा वाढता सहभाग, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बांधणी यामुळे चिमूर तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवचैतन्य प्राप्त झाले असून, आगामी काळात भगवा अधिक ताकदीने फडकविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



