श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न
श्री च्या पालखीची शहरात भक्ती मे वातावरणात मिरवणूक काढली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :- श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त श्री संत चोखोबा महाराज यांची पालखी श्री बालाजी महाराज नगरीतून काढण्यात आली महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली
शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर माळीपुरा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा निमित्त दिनांक ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उत्सव समिती तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर युवा उत्सव समिती व समस्त समाज बंधू भगिनी आणि भक्तगण यांनी आयोजन केले होते. या सप्तांमध्ये दररोज काकडा , हरिपाठ ,संध्याकाळी हरिकीर्तन झाले .श्री संत सावता महाराज चरित्र ग्रंथाचे वाचन ह भ प वैभव महाराज झोरे यांनी केले ज्ञानेश्वर सामूहिक पारायण हभप अनिल महाराज सपाटे व ह भ प सुरज महाराज कोळे यांनी केले .स्वतःमध्ये दररोज संध्याकाळी हरी किर्तन झाले यामध्ये सर्वश्री हभप वैभव महाराज झोरे ह भ प गजानन दादा शास्त्री ह भ प राजू महाराज खराडे ह भ प महाराज फरकाटे ह भ प वैष्णोदास भिकाजी महाराज मोठेह भ प प्रमोद महाराज सानप ह भ प प्रदीप महाराज कायंदे तसेच काल्याचे किर्तन संत चरणदास निकम महाराज यांनी केले
दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी संत सावता महाराज मंदिरातील श्रीमूर्तीला महाभिषेक पवन जोरे यांनी संपत्ती केले .यानंतर पुष्पहार आणि सजवलेल्या पालखीत संत सावता महाराज यांचा चांदीचा मुखवटा व पादुका ठेवून झेंडेकरी टाळकरी वारकरी मृदुंगाचार्य गायनाचार्य आदींच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणा करण्यात आली ग्रामदैव श्री बालाजी महाराज मंदिर ला प्रदर्शना करून पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर हभप संत चरणदास निकम महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले यानंतर मंदिर समिती व शहरातील गणमान्य व्यक्ती यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली .सर्व कार्यक्रम भक्तिवे वातावरणात उत्साही वातावरणात संपन्न झाले .याप्रसंगी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .मंदिर समितीच्या वतीने उत्सवा सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले



