ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आरसीईआरटीमध्ये इस्रोच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (RCERT), चंद्रपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग, CSI विद्यार्थी शाखा आणि IIC सेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इस्रोच्या रीजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC-C), नागपूर यांच्या सहकार्याने ‘राष्ट्रीय अंतराळ दिन २०२६’ निमित्त विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत इस्रोच्या विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रम, उपग्रह तंत्रज्ञान, पृथ्वी निरीक्षण प्रणाली, रिमोट सेन्सिंग आणि अंतराळ क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) चे अध्यक्ष श्री. विनोद दत्तात्रेय होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे, RRSC-C, नागपूरचे ग्रुप जनरल मॅनेजर डॉ. जी. श्रीनिवासन, डॉ. दारुकेश, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. साधना जैन, Scientist-SE श्री. सुशील कुमार, National Remote Sensing Centre, हैदराबादचे Purchase & Stores Officer श्री. खरतमल ज्ञानेश्वर शंकर, Scientist/Engineer-SC श्री. चोक्कय्यागरी साईचरण आणि CSE विभागप्रमुख डॉ. नितीन जानवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व स्वागतपर भाषणाने झाली. डॉ. माधवी साडू, CSI समन्वयक यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेदरम्यान भारतीय अंतराळ कार्यक्रमाची वाटचाल, उपग्रह तंत्रज्ञान, पृथ्वी निरीक्षण प्रणालींचा समाजहितासाठी होणारा उपयोग, रिमोट सेन्सिंगचे विविध क्षेत्रांतील अनुप्रयोग तसेच अंतराळ संशोधनातील रोजगार व करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञांनी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत विविध प्रश्न उपस्थित केले आणि त्यांची उत्तरे जाणून घेतली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रावणी त्रिकोलवार आणि अलवीरा कुरेशी यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. अंजुम कुरेशी, IIC सेल प्रभारी यांनी उपस्थित मान्यवर, इस्रोचे तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींची दिशा मिळाली.