पालकमंत्र्यांना आदिवासीचे साकडे माणिकगड जमिनप्रश्न सोडवा
अन्यथा आत्मदहणाची परवानगी द्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या गडचांदूर स्थीत माणिकगड युनिट च्या चुनखड्डी खदान जमिनवाद विकोपाला गेला हे शासन प्रशासन यांना माहीत असताना गेल्या १५वर्षापासून शेतकऱ्याचा जमिनिचा प्रश्न सुटला नसल्याने कंपनी व्यवस्थापन व आदिवासी मध्ये संघर्ष सुरू आहे एप्रील मध्ये संतप्त निराश्यातुन ५ आदिवासी कोलाम शेतकऱ्यानी विष प्राशन करूण राज्यभर खळबड माजविली पालकमंत्री अशोक उईके रुग्णातलयात भेट घेऊन अदिवासीना ८ दिवसात प्रशन मार्गी लावण्याचा शब्द दिला जिल्हाधिकारी यांनी दि २९ एप्रिल ला बैठक घेऊन ३० दिवसात नोकारी कुसुंबी ची भुमापन मोजणी करण्याचे निदेश दिले मात्र कालावधी लोटून सुद्धा मोजणी झाली नाही कंपनी व्यवस्थापक यांनी२६ जुन २० २५ ला लेखी पत्र देऊन कंपनी संपुर्ण मोजणीची फी भरण्यास तयार असल्याचे पत्र देऊन सुद्धा फिर जाव करत आहे.
कंपनी पाप उघड पडू नये म्हणून मोजणी करणार नाही तब्बल ४० वर्ष होऊन सुद्धा मोजणी का झाली नाही भूमि अभिलेख विभागात कंपनी ने कमी जास्त पत्रक सादर करुण दुरुस्ती का केली नाही हे प्रश्न निर्माण होत आहे कंपनीने निस्तार हक्काचा संपुर्ण रस्त्यावर कब्जा करुण गेट बसविले व रस्ता अडविला अनेक तकारी करुण सुद्धा नोकारी कुसुंबी आसापूर रस्ता बंद पाडला उपविभागीयअधिकारी यांनी 23 जुन २०२६ ला आदेश देऊन सुद्धा रस्ता खुला झाला नाही १९ आदिवासी च्या जमिनीचा मोबादला मिळाला नाही नोकरी दिली नाही कम्पा क्र ३६ मध्ये वनक्षेत्रात व कोलामा च्या जमीनीवर कंपनीने जडवाहन वाहतुकीचा रस्ता तयार करुण शोषण केले आदिवासी वर खोटे १२ गुन्हे दाखल झाले मात्र अन्याय करणारी फसवणुक करण्याऱ्या सिमेंट कंपनिला रान मोकळे केले मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस हे सुद्धा मुंबई मध्ये प्रसार माध्यमा समोर आम्ही आदिवासी च्या पाठीशी खंबीर उभे आहो म्हणतात मग आदिवासी चा प्रश्न मार्गी का लागत नाही तातडीने प्रश्न मार्गी लावा किवा आत्मदहनाची परवानगी द्या असे म्हणत होत असलेला अन्याय अवगत करूण दिला तातडीने कारवाई झाली पाहिजे.
अशी मागणी आबिद अली जंगू पेंदोर सोमा आत्राम भावराव कन्नाके सुनिल पेंदोर बालुसिजम महादेव कुडमेथे गणेश सिडाम जैराम कुड्मेचे यांचे सह महिला आदिवासी मोठ्या संख्येनी उपस्थित होते



