ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून अट्टल घरफोडी करणारे आरोपी जेरबंद

पो स्टे सेलू येथील घरफोडीचा गुन्हा उघड करून एकूण 7 लाख 9 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्ह्यांची हकीकत याप्रमाणे आहे कि, दिनांक 16.07.2026 रोजी फिर्यादी नामे राहुल गजानन फॅटिंग वय 35 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 03 जयस्वाल लेआऊट सेलू ता सेलू.जि. वर्धा यांनी पो. स्टे. येऊन तक्रार दिली कि फिर्यादी हे दिनांक 13.07.2026 रोजी 10.30 वा. संपूर्ण परिवारासह बाहेर गावी गेले असता दिनांक 16.07.2026 ला फिर्यादीने घरी येऊन बघितले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घरच्या आत प्रवेश करून सोन्याचे चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 2,26,000/- रु चा मुद्देमाल चोरून नेल्याचे सांगितले वरून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सेलू अप क्रमांक 535/2026कलम 305 (अ), 331 (3) 331 (4) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नमुद गुन्हा अज्ञात आरोपीतांनी केला असल्याने तो उघड होण्याकरीता स्था.गु.शा वर्धा हे समांतर तपास करीत घटणास्थळी भेट देवुन सदर घरफोडी संबंधाने तांत्रिक तपासाद्वारे व गोपनीय माहीती वरून सदरची घरफोडी करणारे निष्पन्न आरोपी नामे 1) मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद अन्सारी वय 25 वर्ष रा. यास्मिन प्लॉट समोसा ग्राउंड बडा ताजबाग नागपूर 2) सोनू उर्फ मोहम्मद शाहिद मोहम्मद रशीद वय 23 वर्ष रा. मोठा ताजबाग दर्गा जवळ नागपूर 3) फैजान युनूस खान राहणार हिंगणघाट जिल्हा वर्धा व पसार आरोपी कमांक 4) शेख आफताभ शेख अब्दुला उर्फ गोलु यांनी केल्याचे निष्पन्न झाल्या वरून आरोपींचा शोध घेणे कामी नागपूर येथे वेगवेगळे पथके रवाना करण्यात आले असुन, आरोपी क्रमांक 1) मोहम्मद जाकीर, आरोपी क्रमांक 2 सोनू उर्फ मोहम्मद शाहिद यांना नागपुर येथुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन चिताफीने ताब्यात घेण्यात आले. व आरोपी क्रमांक 3 फैजान खान यास हिंगणघाट येथून ताब्यात घेऊन गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्यांचे कडुन गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन मारूती सुझुकी कंपनीची रिस्ट गाडी क्रमांक एम.एच 01 ए. एल 7330 व नगदी असा एकूण जुमला किंमत 07,09,100 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयातील आरोपी कमांक 04) शेख आफताभ शेख अब्दुला उर्फ गोलु हा पसार असुन त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेतील पथक घेत आहे.

यातील आरोपी मोहम्मद जाकीर हा अटल गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द नागपुर जिल्हयात घरफोडी चोरी, शरीराविरुदचे व हत्यार कायद्याप्रमाणे असे गंभीर 36 गुन्हे नोंद आहे. आरोपी सद्या पोलीस कस्टडी मध्येअसुन फरार आरोपीचा व चोरी गेलेल्या उरर्वरीत मुद्देमालाचा शोध घेणे सुरू आहे.

सदर ची कार्यवाही मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स. पो.नि. आशिषसिंह ठाकूर, पो.उप.नि विजयसिंह गोमलाडू स.पो.नि योगश कुमार लाडे पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, अरविंद येणुरकर, जगदिश डफ, रोशन निभोरकर, रवि पुरोहित, सागर भोसले, विकास मुंडे, आशिष उमेकर, सुगम चौधरी, शुभम राउत, अभिषेक नाईक चालक अखिल इंगळे रितेश गेटमे सायबर सेल चे पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, गोविंद मुंडे, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये