सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने स्व अजितदादा पवार यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा.अशोक डोईफॊडे
देऊळगाव राजा :- महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांची ६७वी जयंती देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल काॅलनी देऊळगाव ,जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन आठवडी बाजार परिसर येथे साजरी करण्यात आली आहे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, प्रकाश खांडेभराड, गोविंदराव अहिरे, मधुकर शेळके , जनार्दन मांटे, होते, सर्वप्रथम स्व अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी राम चौधरी, शांति लालजी निरफळे, प्रा अशोक डोईफोडे, प्रा विनायक कुळकर्णी,मार्तंड आप्पा घिके,बाबुलाल शिवरकर,अरुण सपाटे, प्रकाश अहिरे,,प्रा.विजय रायमल, रमेश नरोडे, गोविंदराव बोरकर उपस्थित होते,यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व.श्री.अजित दादा पवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तसेच भारतीय तिरंगा ध्वज दिनाच्या निमित्ताने माहीतीपूर्ण भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन रमेश नरोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले,शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



