ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. पूजा देऊरकर यांच्या रूपाने भद्रावती शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      चक्क जागतिक स्तरावरील योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देशाची मान उंचावणारी अतुलनीय कामगिरी केली.

पूर्व इतिहास बघता डॉ. पूजाताई एका जर्जर आजाराने ग्रस्त, आहारात लिक्वीड सदृश्य पदार्थ ते हि मर्यादेत, आर्थिक स्थिती बेताची.

मात्र योगासन एके योगासन हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर एकापेक्षा एक सरस असे नैपुण्य प्रदर्शित करीत ती थेट पोहचली चक्क जागतिक पातळीवर.

एकूण ७५ देश कडवे आव्हान मात्र जिद्द, आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छा शक्ती, नियमित सराव, शिस्त व आंतरिक प्रेरणा या बळावर या भद्रवतीच्या कन्येने ३५ ते ४५ वयोगटातील इतर स्पर्धकांना मागे टाकत थेट सुवर्ण पदक जिंकले.

डॉ. पूजाताई तुझे अभिनंदन तुझे कौतुक करावे तेवढे कमीच… या उज्वल यशाबद्दल तुला आभाळभर शुभेच्छा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये