ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वर्धा विभागाच्या वतीने मौजा वरुड येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धाचे उपवनसंरक्षक हरवीर सिंग होते. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) माधव ओझे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व वन्यजीव) हरिलाल सरोदे मानव वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कु. वैशाली भलावी उपस्थित होत्या.

कार्यक्रमात नर्सिंग कॉलेज सावंगी तसेच कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, सेवाग्राम येथील विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच लिला पुनावाला फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधिक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात वनविभागातील वनपाल, वनरक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये