ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनोळखी वृद्ध महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

सेवाग्राम पोलिसांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास सेवाग्राम येथील नवदुर्गा पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर अंदाजे ७० वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी सेवाग्राम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २७/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे.

मृत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –

वय : अंदाजे ७० वर्षे

उंची : अंदाजे ५ फूट २ इंच

बांधा : कृश

रंग : गोरा

डोक्यावरील केस : पांढरे व पातळ

उजव्या हातावर गोंदलेले दोन ठिपके

डाव्या हातावर मनगटाजवळ कायमस्वरूपी दोन बांगड्यांचे वर्तुळाकार ठिपके

पोटावर शस्त्रक्रियेची खुण

सदर महिलेची ओळख अथवा नातेवाईकांची माहिती कोणाला असल्यास त्वरित सेवाग्राम पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क अधिकारी :

पोलीस उपनिरीक्षक (PSI) वाल्मिक बांबर्डे – ८२६३८४९१३६

पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप कडू पाटील – ९८९०७९४८०१

पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर सेवाग्राम – ८८८८८१३७३५

पोलिस स्टेशन सेवाग्राम दूरध्वनी – ०७१५२-२६०३३०

नागरिकांनी या अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी पुढाकार घेऊन पोलिसांना मदत करावी, असे आवाहन सेवाग्राम पोलिस प्रशासनाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये