ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वळण रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चा पाठलाग करताना. महसूल पथकाला खाजगी वाहनाची आडकाठी..

सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कितीही कार्यवाया झाल्या तरी आम्ही आमचा कार्यभार उरकणारच याप्रमाणे अवैध वाहतूक करणाऱ्या दोन टिप्पर चा पाठलाग करत असताना रेती तस्कराने स्वतःच्या गाडीने सदर पथकाला अटकाव करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला.

सदरचा थरार शहराबाहेरील वळण रस्त्यावर काही काळ चालल्यामुळे अवैध रेती तस्करांची कशा प्रकारे मुजोरी वाढलेली आहे याचे प्रात्यक्षिक रेती तस्करांनी दाखवल्यामुळे आता हातबल झालेले महसूल पथकाकडे गुन्हा दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सविस्तर वृत्त असे की,खडक पूर्णा नदीपात्रातून अवैध रीती उपसा तसेच वाहतुकीला निर्बंध घालण्यासाठी महसूल पथक आटापिटा करत असताना अवैध रेती तस्कराने त्याच्या मालकीच्या दोन टिप्परला मार्ग मोकळा करून देण्यासाठी महसूल पथकाच्या गाडीला अटकाव केला. दिनांक 25 मे च्या मध्यरात्री तहसीलदार वैशाली डोंगर जाळ, यांच्यासह तीन ग्राम महसूल अधिकारी आणि एक महसूल सेवक शासकीय गाडीतून पेट्रोलिंग करत असताना शहराबाहेरील वळण रस्त्यावरून अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर आढळले यापैकी एका टिप्परला थांबविण्यात महसूल पथकाला यश आले.

थांबवलेल्या टिप्पर मध्ये दोन महसूल कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले. आणि पुढे गेलेल्या टिप्पर चा पाठलाग करण्यासाठी तहसीलदार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पाठलाग करणे सुरू केले. काही अंतरावर पाठलाग करत असताना अवैध रेती तस्कराने त्याच्यासोबत असलेले बोलोरो वाहन क्रमांक एम एच ४७ ए वाय 38 73 या वाहनातून पाठलाग करून महसूल पथकाच्या गाडीला पाठलाग करण्यापासून रोखले, तर थांबवलेले रेती टिप्पर तेथे उपस्थित असलेल्या दोन महसूल कर्मचाऱ्यांनी रेती तस्करांनी धमक्या देऊन सदरचे टिप्पर सुद्धा पळवून घेऊन गेले. शहराबाहेरील वळण रस्त्यापासून मराठवाडा हद्दीपर्यंत सदरचा थरार चालू होता.

यापूर्वी सुद्धा रेती तस्करांनी महिला नायब तहसीलदाराच्या अंगावर रेतीचे टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला होता याला काही काळ लोटला नाही तर दुसरीही घटना घडल्याने अजून सुद्धा या मजूर रेती तस्करांचा बंदोबस्त होत नसल्याने एक प्रकारे रेती तस्कराच्या मजुरी पुढे प्रशासन हतबल तर झाले नाही ना..? असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्यांना यावेळी पडत आहे रेती तस्करांची एवढी मुजोरी वाढलेली असताना महसूल, पोलीस, जलसंपदा, आणि परिवहन ज्या संबंधित विभाग संयुक्त कारवाई का करत नाही हे गुड सुद्धा सद्यस्थितीत अकालनीय आहे. ग्राम महसूल अधिकारी संजय बरांडे यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यामध्ये टिप्पर चालकाने अवैधरित्या चार ब्रास रेती किंमत वीस हजार आणि दुसरे एक टिप्पर यांना पळवून लावण्यासाठी सहकार्य केल्याप्रकरणी बोलेरो वाहन चालक आणि मालका विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि इतर कलम अवॉर्ड गौण खनिज अधिनियम अन्वये देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिनांक 26 ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये