ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी

ओबीसी जनजागृती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : ओबीसी जनजागृती संघटना, जिल्हा वर्धा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे की. सदर निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी वर्धा यांनाही देण्यात आलेली असून .संघटनेच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,भारताच्या राज्यघटने नुसार स्वतंत्र मंडल आयोग तयार करण्यात येऊन भारतातील ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची, शैक्षणिक स्थितीची व आर्थिक परिस्थितीची अचूक माहिती उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या विविध योजना, आरक्षण, कल्याणकारी धोरणे व विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे सामाजिक न्याय, समता व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.तसेच जातीनिहाय जनगणनेमुळे समाजाची वास्तविक लोकसंख्या, शैक्षणिक प्रगती, आर्थिक परिस्थिती, रोजगारातील सहभाग व सामाजिक स्तर यांची अचूक माहिती समोर येईल. यामुळे शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे अधिक सुलभ होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ओबीसी जनजागृती संघटनेने केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत की आगामी जनगणनेत ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा.ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.

या जनगणनेतील माहिती सार्वजनिक करून सामाजिक न्यायाच्या धोरणांसाठी तिचा उपयोग करण्यात यावा.ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विविध क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व व कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यात यावे.सामाजिक न्यायाच्या दृष्टीने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.या वेळेस निवेदन देताना उपस्थित असलेले डॉ अभ्युदय मेघे नगर परिषद वर्धा चे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ नागेश तांगडे प्रमोद भोमले अर्चना भोमले सोनाली कोप्पुलवार बाळा माऊसकर विनय डहाके राजेंद्र भोमले आणी ओबीसी समाजातील मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये