ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा वनविभागाच्या वतीने हिंगणघाट येथे मौजा जामणी वन्यप्राणी शिकार प्रतिबंध व वन्यजीव संरक्षण विषयक जनजागृती अभियान

श्री.हरविंदर सिंग उपवनसंरक्षक वर्धा व श्री हरिलाल सरोदे सहाय्यक उपवनसंरक्षक वर्धा यांनी तेंदू व वन्यजीव यांच्यावर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 27 मे 2026 रोजी वन विभाग वर्धा यांच्या वतीने हिंगणघाट तालुक्यातील मौजा जामणी येथे वन्यप्राणी शिकार प्रतिबंध व वन्यजीव संरक्षण विषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या मोहिमेद्वारे नागरिकांना वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व तसेच वन्यप्राणी शिकार हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली.कार्यक्रमादरम्यान जामणी ग्रामस्थ, शेतकरी व युवकांना वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत असलेल्या तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. तसेच वनक्षेत्रात संशयास्पद हालचाल, सापळे किंवा शिकारविषयक माहिती आढळल्यास तात्काळ वन विभागास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर कार्यक्रम माननीय उपवनसंरक्षक श्री. हरवींदर सिंग तसेच माननीय हरिलाल सरोदे, सहाय्यक उपवनसंरक्षक, तेंदू व वन्यजीव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. तसेच माननीय वैशाली भलावी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा यांच्या नेतृत्वाखाली हिंगणघाट सहवन क्षेत्रातील वनाधिकारी कु.मंजु रवाडे क्षेत्र सहाय्यक हिंगणघाट,दीपक वैरागडे वनरक्षक वेळा, रमेश कुडके वनरक्षक कडजना,केशव शिंदे वनरक्षक सेलू मुरपड,योगेश पाटील वनरक्षक हिंगणघाट,चंद्रशेखर दारोडे पोलीस पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री. निलेश राऊत, वाईल्डलाईफ कंट्रोल ब्युरो, मुंबई यांनी उपस्थित नागरिकांना वन्यजीव संरक्षण, शिकार प्रतिबंध तसेच वन्यप्राणी संवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती केलेली आहे वन विभाग वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये