त्याग, समर्पण व बलिदानाचे प्रतीक बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भारतीय समाजजीवनातील सण-उत्सव ही केवळ आनंदाची क्षणे नसतात तर ते समाजाच्या नैतिक मूल्यांची, सांस्कृतिक परंपरांची आणि मानवी नात्यांची पुनःप्रत्ययकारी स्मृती असतात. प्रत्येक सण माणसाला काहीतरी शिकवून जातो. काही सण आनंद शिकवतात, काही कृतज्ञता, काही एकात्मता, तर काही आत्मपरीक्षण.
बकरी ईद, ज्याला ईद-उल-अजहा असेही म्हटले जाते, हा असाच एक सण आहे, जो केवळ धार्मिक विधींचा दिवस नसून त्याग, समर्पण, करुणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे गहिरे तत्त्वज्ञान आपल्या समोर ठेवतो.
भद्रावती शहरात आज दि.२८ रोजी सकाळपासून विविध दर्गा व मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून, एकमेकांना अलिंगन देत बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या.
जामा मस्जिद चे इमाम अब्दुल गफार अन्सारी, गरीब नवाज मस्जिद चे हाफिज मुज्जमिल साहेब, मदीना मस्जिद चे इमाम मौलाना फारुख, यांचे प्रमुखतेत सुमठाना येथील ईदगाह येथे जामा मस्जिद चे अध्यक्ष हाजी बबन शेठ, हाजी जाकीरभाई, हाजी शाहिद अली, हाजी अब्बास, पत्रकार जावेद शेख, मुनाज शेख, इजाज अली बाबूभाई सय्यद, इम्रान खान, सिकंदर शेख, पप्पू शेख, जफर शेख, शाहिद शेख यांचे सह समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते.
शहरातील गैर मुस्लिम बांधवांनी धर्मनिरपेक्षतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या.आणि भद्रावती शहर सर्व धर्म समभावाचे प्रतीक असल्याचा परिचय दिला.



