ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           नगर परिषद भद्रावती अंतर्गत येणाऱ्या सर्वच वॉर्डांत मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस वाढीस लागला असून पाळीव जनावरांपासून ते लहान मुले व नागरिकांना चावे घेण्याच्या घटनेत वाढ होत आहे.

दि.२५ रोज भद्रावती येथील गौतम नगर वॉर्डांत कुत्र्यांनी चक्क चार मुलांना चावा घेऊन जखमी केल्याचा प्रकार समोर आला. तद्वतच इतर वॉर्डात सुद्धा मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस असल्याने जनजीवन भयभीत झाले आहे.

कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रेबीज लस व तत्सम औषधी नसल्याने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा उपरोधिक सल्ला दिला जात आहे.

 स्थानिक नगर परिषदेने यावर उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षितता द्यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक नरेंद्र पढाल, माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक सुनील नामोजवार, नगरसेवक महेश जीवतोडे, उषा जाधव यांनी मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांना निवेदन सादर करून केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये