पोंभुर्णा केमिस्ट संघटनेचा संप
ऑनलाइन औषध विक्री व जनस्वास्थ्याच्या प्रश्नांवर आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
देशभरातील केमिस्ट आणि औषध विक्रेते २० मे रोजी संपावर असल्याची माहिती ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) तर्फे देण्यात आली आहे. हा संप केवळ व्यापारी हितासाठी नसून जनस्वास्थ्य, रुग्णांची सुरक्षितता आणि औषधांच्या योग्य वापराशी संबंधित गंभीर मुद्द्यांसाठी असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
पोस्टरद्वारे मांडण्यात आलेल्या प्रमुख चिंतांमध्ये AI चा वापर करून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार होणे, फर्जी डॉक्टरांकडून ऑनलाइन सल्ला, ऑनलाइन ऑर्डरमध्ये खरी औषध विक्रेता ओळख लपवली जाणे, तसेच अँटिबायोटिक्स व व्यसनाधीन औषधांची अनियंत्रित विक्री यांचा समावेश आहे.
संघटनेच्या मते, एकाच प्रिस्क्रिप्शनचा वारंवार वापर करून औषधे खरेदी केली जात असून फार्मासिस्टची जबाबदारी आणि व्यावसायिक सन्मान कमी होत आहे. याशिवाय GSR 817(E) आणि GSR 220(E) नियमांतील त्रुटींचा गैरवापर करून अवैध ऑनलाइन औषध विक्री वाढत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
AIOCD ने म्हटले आहे की, औषधांना सामान्य व्यावसायिक वस्तू न मानता जनस्वास्थ्याशी निगडित जबाबदारी म्हणून पाहिले जावे. रुग्णांची सुरक्षा, औषधांचा योग्य वापर आणि फार्मसी व्यवसायाचा सन्मान टिकवण्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला असल्याचे संघटनेने स्पष्ट केले
या वेळी संघटनेचे अध्यक्ष विजय पाल पीपरे, गुरुदास पिपरे सचिव, महेंद्र ठेंगणे, रवी बुक्कावार अतुल कोसळकर नितीन बोराडे ज्ञानेश्वर पिझ्झा रे वेदांत बुरांडे जितेंद्र वासेकर दिनेश चिचघ रे, प्रवीण दुर्गे परशुराम बुरांडे शुभंकर सरकार इत्यादी कार्यकर्ते व मालक उपस्थित होते



