ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इयत्ता १० वी, १२ वी व जेईईमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

आमदार किशोर जोरगेवार यांचा पुढाकार, अम्मा की पढ़ाई फाउंडेशनचे आयोजन  

 चांदा ब्लास्ट

अम्मा की पढ़ाई फाउंडेशनच्या वतीने इयत्ता १० वीमध्ये ८० टक्के व इयत्ता १२ वीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी आणि विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने “गुणगौरव व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन २०२६” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय वक्ते तथा “महाराष्ट्रियन ऑफ द इयर पुरस्कार २०२५” सन्मानित यजुवेंद्र महाजन उपस्थित राहणार आहेत. ते राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समिती तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकारचे सदस्य आहेत.

यावेळी चंद्रपूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे. अम्मा की पढ़ाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मिळावी, त्यांना प्रेरणा मिळावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांनी दिनांक २१ मे २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“अल्ट्रा मॅन” किताब पटकाविणाऱ्या डॉ. प्राजक्ता आस्वार यांचा होणार सत्कार

डॉ. प्राजक्ता आस्वार यांनी ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या जगातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या “अल्ट्रा मॅन ऑस्ट्रेलिया” या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करत “अल्ट्रा मॅन” किताब पटकावला आहे. जागतिक स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवत त्यांनी भारताचे तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये