स्टेट बँक ऑफ इंडिया येथे ग्राहक संमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय स्टेट बँक शाखा देऊळगाव राजा येथे ग्राहक संमेलन चे आयोजन 18 मे रोजी करण्यात आले होते. शहरातील दोन्ही शाखा च्या वतीने आयोजित ग्राहक संमेलन मध्ये बुलढाणा येथील क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य व्यवस्थापक श्री सौरभ सुरेंद्र व उप व्यवस्थापक प्रवीण नवले यांनी स्टेट बँकेच्या वतीने व्यापारी व नोकरदार व्यक्ती साठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना ची माहिती दिली.
ग्राहकांनी डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले, ग्राहकांनी यावेळी विविध समस्या उपस्थित केल्या, सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, शाखा व्यवस्थापक अंकुश रोडे व नागेश टेकाळे यांनी सुद्धा ग्राहकांना मार्गदर्शन केले.
ग्राहकांच्या समस्याचे निराकरण केले,बँकेचे ग्राहक, व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी, बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेट बँकेच्या दोन्ही शाखा मध्ये ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यात येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.



