ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरफोडी करून पाऊणेदोन लाखांची चोरी, आरोपी अटकेत

ठाणेदार हत्तीगोटे यांची कार्यवाही 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

मुलीच्या लग्नाच्या नियोजनाकरीता रामटेक येथून गोंडपिपरी येथे कुटुंब स्थिरावले. लग्नाचा आदल्या दिवशी कुटुंबातील मंडळी हळदीच्या कार्यक्रमासाठी सभागृहात गेले असता चोरट्याने घराचा कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. दरम्यान या चोरट्याला पकडण्यात गोंडपिपरी पोलिसांना यश आले आहे. ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी तपासाची चक्र फिरवीत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख सदतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून करण भालचंद्र आलाम (वय २१) रा. गणपूर असे आरोपीचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील सुधाकर आलाम यांच्या मुलीचे लग्न गोंडपिपरी येथे होणार होते. या लग्नाच्या नियोजनकरीता आलाम परिवार स्थानिक शिवाजी चौकात किरायाने घर घेऊन वास्तव्य करीत होते. दरम्यान मुलीच्या हळदीच्या कार्यकर्मासाठी गोंडपिपरी येथील मंगल कार्यालयात समस्त कुटुंब गेले होते.

 हीच संधी साधुन चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप फोडले.सोने, चांदीचे दागिने व नगदी साठ हजार असा एकूण १,७६,०००/_रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता. आलाम कुटुंब कार्यक्रम संपल्यानंतर घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनाश आले. दुसऱ्या दिवशी या घटनेची तक्रार गोंडपिपरी पोलिसात दाखल करण्यात आली.

चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप फोडले.सोने, चांदीचे दागिने व नगदी साठ हजार असा एकूण १,७६,०००/_रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता. आलाम कुटुंब कार्यक्रम संपल्यानंतर घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनाश आले. दुसऱ्या दिवशी या घटनेची तक्रार गोंडपिपरी पोलिसात दाखल करण्यात आली.

ठाणेदार रमेश हत्तीगोटे हे या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. शेवटी चोरट्यास पकडण्यात आले. करण भालचंद्र आलाम असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो गोंडपिपरी तालुक्यातील गणपूर येथील रहिवासी आहे. चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कडून १,३७,५००/_ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार रमेश हत्तीगोटे प्रशांत नैताम,प्रवीण कदम यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये