प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, देऊळगाव राजाच्या वतीने बाल संस्कार शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा च्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते, विद्यालय च्या प्रमुख सुनंदा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात 13 मे ते 15 मे दरम्यान बाल संस्कार शिबिर पार पडले, या शिबिरात मुलामध्ये चांगले संस्कार, सकारात्मक विचार, मूल्य शिक्षण, योगासने, याचे प्रशिक्षण देण्यात आले,आत्मविश्वास विकसित करण्यासाठी एक प्रेरणादायी शिबिर ठरले,
या शिबिरात देवकला दिदी, ज्योती भोरे दिदी,अंबड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड, प्रा अशोक डोईफोडे, गोविंदराव अहिरे, शांतीलाल निरफळे, डॉ अनिल मोळवणे, प्रल्हाद ढोरे यांनी मार्गदर्शन केले,
डॉ अनिल मोळवणे यांनी सकस आहार, फळ व भाजीपाल्याचे आहारातील महत्त्व सांगून बाहेरील खाद्यपदार्थ न खाण्याचे आवाहन केले,
प्रकाश खांडेभराड यांनी बाल संस्कार, पर्यावरण यांवर मार्गदर्शन केले, सीड बॉल निर्मिती चे प्रात्यक्षिक करून घेतले, गोविंदराव अहिरे यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ निरोगी शरीरासाठी योगा चे महत्त्व सांगून विविध प्रकारचे योगासने करून घेतले, व नियमित योगासने करण्याचे आवाहन केले. प्रा अशोक डोईफोडे यांनी बालकावर योग्य संस्कार करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. शांतीलाल निरफळे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याचे आवाहन करून पालकांनी सर्वप्रथम आचरणात आणणे गरजेचे आहे असे सांगितले.
ज्योती भोरे यांनी मोबाईल चे फायदे व तोटे सांगत विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत मोबाईल चा वापर करावा असे सांगितले. देवकला दिदी व ज्योती दिदी यांनी विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे दिले, संजय तिडके या विद्यार्थ्यांने अयोध्या येथील राम मंदिराची अतिशय सुंदर प्रतिकृती तयार केली, त्याचा सत्कार करण्यात आला,
बाल संस्कार शिबिर मध्ये विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,



