ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाचा वर्ध्यात मोठा भडका

NSUI चे आक्रमक आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा | NEET UG २०२६ परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असताना, याचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. या घोटाळ्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI), वर्धा यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकार आणि NTA विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकार तसेच NTA विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “NTA रद्द करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “पेपर लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी NEET UG 2026 परीक्षा झाल्यानंतर समोर आलेल्या पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात, मात्र अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

NSUI च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या :

• NTA संस्था तात्काळ रद्द करण्यात यावी

• पेपर लीक प्रकरणातील दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा

• विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी

• केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा

आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहील, असा इशाराही NSUI च्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष विश्वभूषण पाटील, होमराज रवंदळे, चेतन तमगिरे, गौरव पहाडे, प्रणय राऊत, विश्वजीत मोरे, तन्मय भुरे, अभिषेक सिंग, नितेश नाडेकर, पवन शेळके, ऋतुजा भोयर, दामिनी कुमरे, अशोक चौधरी, प्रज्ञा वैरागडे, अश्विनी सोनकर, नेहाल आलाम, ब्रिजेश सोनकर तसेच नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, डॉ अभ्युदयजी मेघे, अर्चनाताई भोमले अंकुश मुंजेवार पराग पिंपळे मोहित सहारे चेतन कडू आणि प्रवीण पेठे तसेच आंदोलनात राजकीय नेत्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते.

पेपर लीकच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ध्यातील या आंदोलनाने प्रशासनावर दबाव निर्माण केला असून, आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

— NSUI, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये