ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने स्वागत

आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती 

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे गांधी चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, महामंत्री रविंद्र गुरुनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, गटनेते शेखर शेट्टी, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, बहुजन महिला आघाडी अध्यक्षा विमल कातकर, अरुण तिखे, निलेश बेलखेडे, सारिका संदुरकर, आशा देशमुख, शीतल गुरुनुले, पुष्पा उराडे, सरला कुळसंगे, नगरसेवक भालचंद्र दाणव, जितेश कुळमेथे, रॉबिन बिश्वास, नितेश गवळी, आशिष मासिरकर, स्वप्निल डुकरे, सायली येरणे, राकेश नाकाडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, वंदना तिखे, चंद्रशेखर देशमुख, प्रमोद शास्त्रकार, सुधीर कारंगल, अॅड. परमहंस यादव, राकेश बोमनवार, रीना साखरकर, लक्ष्मी पांडे, छाया चावरे, आमेश आयलू आदींची उपस्थिती होती.

मिरवणुकीदरम्यान नागरिकांसाठी शीतपेयाचे वाटप करण्यात आले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या सेवाभावी उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने वाटप केल्यामुळे कार्यक्रमाला अधिक चांगली रंगत आली.

यावेळी बाबासाहेबांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

अशा सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांमुळे बहुजन समाज अधिक जवळ येतो आणि समाजात एकात्मतेची भावना अधिक दृढ होते. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

घुग्घुस येथेही भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहरच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत स्वागत करत शीतपेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी घुग्घुस येथील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये