ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अमरावती मध्यवर्ती कारागृहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला किर्ती चिंतामणी अमरावती कारागृह अधिक्षक यांनी माला अर्पण करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला आले असून 135 वर्षे पूर्ण झाले आहेत या निमित्ताने अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक किर्ती चिंतामणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर ज्योती आठवले वरिष्ठ तुरुंगअधिकारी यांनी सुद्धा फोटोला माला अर्पण करून अभिवादन केले यानंतर संघमित्रा शेळके तुरुंग अधिकारी यांनी सुद्धा फोटोला माला अर्पण करून अभिवादन केले यानंतर जयंती करीता कैदी बांधवांनी ड्राय फ्रूट आणि बिस्केटा पासून तयार केलेला 5 किलोचा केक कापून सर्व अधिकारी वर्ग आणि कैदी बांधवांना वाटप करण्यात आले यानंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहातील सर्व कैदी बांधवांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अमरावती मध्यवर्ती कारागृहातील सर्व कैदी बांधव आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच कारागृह वसाहतीत सुद्धा जयंती साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी बुद्ध वंदना घेऊन पठ्ठन करण्यात आले आहे आणि भीम गीत सादर करण्यात आले आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष कार्य वरिष्ठ तुरुंगअधिकारी ज्योती आठवले यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये