ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोजोलीत आरोग्य तपासणी शिबिरातून “भीमजयंती” साजरी

मुलगंधकुटी बुद्ध विहाराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगात विश्वरत्न, क्रांतीसुर्य, दि सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी होत असताना, गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे मुलगंधकुटी बौद्ध विहार यांचे वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

    सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून, निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरित्या त्रिसरण, पंचशील आणि बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.

आरोग्यं क्लिनिक अँड डे केअर सेंटर गोंडपिपरीच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिरात गावातील व परिसरातील शेकडो लोकांनी तपासणी केली. आरोग्य शिबिरात डॉ. प्रशिक झाडे यांच्या नेतृत्वात डॉ. प्रणित झाडे, डॉ. अर्पण झुरे, डॉ. हर्षा चौधरी यांच्यासोबतच लॅबोरेटरीचे धर्मेंद्र पावडे आणि मेडिकलचे लिलाधर नगारे यांनी सहकार्य केले.

  सायंकाळी गावातील मुख्य मार्गावरून तसेच चौकाचौकात भेटी देत “भीमज्योत रॅली” काढण्यात आली. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भीमजयंतीच्या यशस्वी आयोजनाकरिता बौद्ध महासभेच्या अध्यक्षा वर्षा अवथरे, रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा बारसागडे, संध्या झाडे, विश्रांती डोंगरे, उज्ज्वला दुर्गे, कल्पना डोंगरे, सुलका दुर्गे, शालिनी डोंगरे, आम्रपाली डोंगरे, ताई झाडे, शालू दुर्गे, प्रज्ञा दुर्गे, सोनाली डोंगरे, नीलिमा मानकर, गीता दुर्गे, प्रीती डोंगरे, कविता तावाडे, लता डोंगरे यांचेसह सर्व महिला, पुरुष अनुयायांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये