ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप समर्थीत शेतकरी विकास आघाडी विजयी

८ संचालक बिनविरोध निवडून आले तर उर्वरित ५ जागांसाठी मतदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितच्या संचालक मंडळाची निवडणूक दि. १२ एप्रिल रोजी उत्साहात पार पडली. एकूण १३ संचालक पदांसाठी निवडणूक होणार होती. यापैकी ८ संचालक बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित ५ जागांसाठी मतदान घेण्यात आले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी समर्थीत शेतकरी विकास आघाडी पॅनलने बाजी मारत ५ पैकी ३ जागांवर विजय मिळविला.

विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून श्रीकांत वडस्कर, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून दिलीप मॅकलवार आणि इतर मागासवर्गीय गटातून ईश्वर नैताम यांचा समावेश आहे.

या विजयानंतर माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, तालुका अध्यक्ष हरि पाटील ढवस, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरिवार, माजी जि.प. सदस्य राहुल संतोषवार, माजी जि.प. अध्यक्ष संतोष कुभंरे, शहर अध्यक्ष रुषी कोटरंगे यांच्यासह नंदकिशोर तुम्मुलवार, जगजीवन ऊराडे, मधूकर टिकले, नगरसेवक दर्शन गोरंटिवार, महेंद्र वनकर, राजू ठाकरे, अविनाश ढोंगे, चरण गुरनुले, चंद्रशेखर झगडकर तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये