ताज्या घडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून शाळा भरविली – भालेराव (सेंट अँड्र्युज पब्लिक स्कूल) शाळेच्या प्रशासनाचा प्रताप

पत्रकार आल्याची चाहूल लागताच मुलांना दिली सुटी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असुन नदी नाले ओसंडून वाहत आहेत  अशातच हवामान खात्याने 27 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असुन जिल्ह्याचा रेड झोन समावेश केला असल्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन 2005 चा कलम 30(2)(5) व (18)नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहिर केली.

वास्तविक बघता जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असुन त्यांचे आदेश सर्वांना बंधनकारक असतात. त्यांनी कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही बल्लारपूर येथिल भालेराव (सेंट अँड्र्युज पब्लिक स्कूल) शाळेच्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून चक्क शाळा सुरू ठेवली.

सदर शाळा सुरू असल्याचे कळताच प्रस्तुत प्रतिनिधीने शाळेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना संबंधित शाळा सुरू असल्याचे आढळून येत त्यांनी परिसरातील छायाचित्रण केले. ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने अचानक  10:30 वाजताच्या सुमारास शाळेला सुटी दिली. यासंबंधात संस्थेचे सचिव गायकवाड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेला सुटी असल्याचे सांगितले मात्र संबंधित प्रकारचे छायाचित्रण आपणाकडे असल्याचे सांगितल्यानंतर मात्र त्यांनी आपण बाहेरगावी असुन तुम्ही स्वतः शाळेत जाऊन बघा असे सांगितले.

वास्तविक बघता जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहिर केल्यानंतरही शाळा सुरू ठेऊन प्रशासन आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे का असा प्रश्न निर्माण झाला असुन ह्या घटनेची सखोल चौकशी करून तसेच शाळेच्या आवारातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही चे चित्रीकरण बघुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकाविणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये