ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या गाडी मध्ये 12,574, किलो गांजा मिळून आला

रेल्वे पोलिसांनी 3,48,260/- रुपयांचा गांजा केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पंकज ढोके सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांची मोठी कार्यवाही

अज्ञात आरोपी विरुद्ध रेल्वे पोलीसांनी रेल्वे पोलिस स्टेशन वर्धा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पोलिस नियंत्रण कक्ष लोहमार्ग नागपूर येथुन मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 18030 हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या कोच नंबर ए.1 बर्थ नंबर 43,45 च्या खाली दोन लावारिस बॅग मिळून आल्याने एन.डिपी.एस.कायदयाचे तरतुदींनुसार लावारिस बॅगचा पंचनामा करण्यासाठी वर्धा तहसीलचे नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी व रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथील पोलिस निरीक्षक पंकज ढोके पोलिस उपनिरीक्षक अंगद कोतवाड पोलिस उपनिरीक्षक नितीन कुमार जाधव व रेल्वे पोलिस कर्मचारी आणि दोन पंच घेऊन हावडा कुर्ला एक्स्प्रेसच्या कोच मध्ये तपासणी करण्यात आली यावेळी एक ग्रे सिल्वर रंगाची ट्राॅली बॅग मिळून आली ज्यावर इंग्रजी शब्दात ऐपेक्स असे लिहिलेले होते.

त्या बॅगची किंमत 1000/-रु‌.नमुद बॅगला ब्राऊन रंगांच्या सेलोटेपणे गुंडाळलेले 10 बंडल असून एकूण 10 किलो 510 ग्रॅम एकूण किंमत 1,56,900/-रुपये व एक डार्क ग्रिन रंगाची ट्राॅली बॅग त्यावर इंग्रजीत 7 इयर्स असे लिहिलेले होते किंमत 1,000/- रुपये सदर बॅगला बी असे मार्क देण्यात आले असून सदर बॅग उघडून पाहिले असताना त्यातून ब्राऊन रंगांच्या सेलोटेपणे गुंडाळलेले एकुण 12 बंडल 12,574 किलो गांजा मुद्देमाल मिळून आल्यानंतर एकूण किंमत 3,48,260/- रुपये मुद्देमाल हस्तगत करून अज्ञात आरोपी विरुद्ध रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अपराध क्रमांक 69/2026 कलम 8(क)20(ब)#(क) NDPS ACT प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कार्यवाही मंगेश शिंदे पोलिस अधीक्षक लोहमार्ग नागपूर अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड लोहमार्ग नागपूर पांडुरंग सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अजय धर्माधिकारी नायब तहसीलदार तहसील कार्यालय वर्धा तसेच पंकज ढोके सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा अंगद कोतवाड पोलिस उपनिरीक्षक, नितीन कुमार जाधव पोलिस उपनिरीक्षक,ASI प्रमोद घ्यारे,Hc अशोक हनुवंते खंडारे, धुर्वे,PC कारमेघे घंगाळ ,भावे , यांनी कारवाई केली आहे अज्ञात आरोपींचा तपास कामी पोलिस कर्मचारी रवाना करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये