ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृक्षमित्र स्पर्धेत चंद्रपूर बचाव संघर्ष समिती अग्रेसर

‘एक विद्यार्थी, एक झाड’ स्पर्धेच्याही विजेत्यांचा गौरव

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी 

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर 

प्रथम पुरस्कार विजेते चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे सदस्य

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित वृक्षमित्र स्पर्धा 2025 मध्ये चंद्रपूर बचाव संषर्घ समितीने प्रथम पुरस्कार पटकावले असून, महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहातपुरस्कार प्रदान करण्यात आले. चंद्रपूर बचाव समितीने हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. गोपाल मुंधडा यांच्या पावन स्मृतींना समर्पित केला.

सोबतच, एक विद्यार्थी एक झाड या स्पर्धेच्याही विजेत्यांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले. ही स्पर्धा शालेय स्तरावर तर वृक्षमित्र स्पर्धा नोंदणीकृत संस्था गट व नागरिकांचा खुले गट अश्या 2 गटात घेण्यात आली होती. विजेत्यांना धनादेश रुपी रोख बक्षिसे देण्यात आली.

महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 10 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत वृक्षमित्र स्पर्धा 2025 आयोजित केली होती. या स्पर्धेत या स्पर्धेत स्थानिक अशासकीय संस्था, एनजीओ, ओपन स्पेस विकास समिती, क्लब्स, जेष्ठ नागरिक मंडळे, युवक-युवती मंडळे तसेच महिला मंडळे अशा 25 संघांनी सहभाग नोंदविला होता.

तर, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने एक विद्यार्थी एक झाड स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दिले गेले व त्या झाडाचे संगोपन व संवर्धन ज्या विद्यार्थ्याने यशस्वीरीत्या केले अश्या 20 शाळांच्या 42 विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

याप्रसंगी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्‍हे, आयुक्त अकुनुरी नरेश, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, परीक्षक सोनाली घनमने, प्रतिभा पेंदाम आदी उपस्थित होते.

*खुल्या गटातून दुसरे पुरस्कार स्वामी समर्थ शिवनेरीला*

खुल्या गटातील प्रथम क्रमांक चंद्रपूर बचाव संघर्ष समितीला प्राप्त झाला असून, 21 हजार रुपयाचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. द्वितीय क्रमांक स्वामी समर्थ शिवनेरी उद्यानला (15 हजार रुपये), तृतीय क्रमांक गुरुबहिनी वृक्षप्रेमी ग्रुप (11 हजार रुपये) तसेच प्रोत्साहन पुरस्कार सारंगी महिला बचत गटाला (5 हजार रूपये प्रदान) करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये