स्वप्नील मेश्राम यांच्या ‘फितूर दिवसांचे संदर्भ’ कवितासंग्रहाचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूरच्या वतीने तसेच अष्टगंध प्रकाशन, ठाणे द्वारा प्रकाशित युवा संवेदनशील कवी स्वप्नील रमेश मेश्राम यांच्या ‘फितूर दिवसांचे संदर्भ’ या कवितासंग्रहाचा भव्य लोकार्पण सोहळा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथील अब्दुल शफी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरकन्हार, गोंदिया येथील प्रख्यात कवी ॲड. लखनसिंह कटरे असणार आहेत. कवितासंग्रहाचे लोकार्पण कवीचे आई-वडील सौ. शितल मेश्राम व श्री रमेश मेश्राम यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध समीक्षक व स्तंभलेखक, वणी येथील डॉ. अजय देशपांडे तसेच प्रसिद्ध कवी तथा समीक्षक, नागपूर येथील प्रा. डॉ. युवराज गंगाराम हे भाष्यकार म्हणून कवितासंग्रहाविषयी भाष्य करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जयश्री कापसे – गावंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप देशमुख करणार असून संचालन इरफान शेख करतील. यावेळी संजय रामटेके, सुरेश नारनवरे आणि अपेक्षा शेंडे यांचे कविता अभिवाचन होणार आहे. आभार सीमा भसारकर करतील.
साहित्यप्रेमी नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूरच्या वतीने केले आहे.



