ठेकेदाराचा धरसोडपणा नागरिकांच्या जीवावर!
तात्काळ प्रभावाने कार्यवाही करावी : नगरसेवक अनिल पडोळे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषद क्षेत्रात कित्येक दिवसांच्या रडगाण्याना कार्यवाहीचे मूर्त स्वरूप आले खरे मात्र काँक्रीटीकरण केल्यानंतर नागरिकांना जाणे येणे करण्याच्या दृष्टीने मधोमत सोडलेल्या गॅप मध्ये तसेच रोड च्या कडेला पेवर ब्लॉक लावणे अतिशय गरजेचे आहे . मात्र ठेकेदार व अभियंता यांच्या लेटलतीफ धोरणामुळे शहरातील कित्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामात उचित नियोजन नसल्याने भीक नको पण कुत्र आवार याचा प्रत्यय नागरिकांना येतो आहे.
काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे यांनी दिनांक २५ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय बांधकाम अभियंत्यास लेखी निवेदन देऊन अर्धवट व काही ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामाची माहिती देऊन तात्काळ प्रभावाने कामे करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील राज बुक डेपो ते पंकज किराणा स्टोअर्स पर्यंत फोडलेल्या मार्गाचे त्वरित बांधकाम करणे, नव्याने बांधलेल्या काँक्रिट रस्त्याची गिट्टी उखळणे यावर उपाययोजना करणे, तसेच नव्याने बांधकाम केलेल्या मस्जिद चौक ते पारेलवार दूध डेअरी पर्यंत पेवर ब्लॉक लावणे, निकृष्ट व गुणवत्तेला डावलून अवघ्या सहा महिन्यात निघत असलेल्या गिट्टी च्या कामाची चौकशी करून योग्य कार्यवाही करणे, आदी समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याबाबत सदर निवेदन देण्यात आले आहे.
यानिमित्ताने देवालय परिसर ते गणेश मंदिर गवराळा येथील झालेल्या काँक्रिट रस्त्याचे काम अर्धवट न सोडता रोड त्वरित पूर्ण करणे, रोड लगत पेवर ब्लॉक जलद गतीने लावणे,तसेच सबंधित ठेकेदार व देखरेख अभियंत्याच्या ‘ दिन मे ढाई कोस ‘ या प्रवृत्तीला लगाम लावणे आदी मागण्यांचा सूर उमटू लागला आहे.



