ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मल्हारी बाबा सोसायटी येथील विद्युत डी.पी स्थानांतर करा

आम आदमी पार्टीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भद्रावती येथे निवेदन देण्यात आले, मल्हारी बाबा सोसायटी येथील स्थानिक लोकांची तक्रार आम आदमी पार्टीला प्राप्त झाली. तक्रार अशी आहे की मल्हारी बाबा सोसायटी येथे खापरी वार्ड मध्ये जाण्याच्या मार्गाला पुलियाजवळ विद्युत डी.पी आहे. सलग तीन दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे वार्डात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक घरांमध्ये पाणी घुसलेला आहे आणि विद्युत डी.पी सुद्धा पाण्याच्या विळख्यात आलेली आहे. कोणतीही अनुचित घटना टाळता येत नाही. त्या विद्युत डी.पी मुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे व ते विद्युत डी.पी आज लोकांसाठी धोकादायक ठरत आहे. यावर तत्काल दखल घेत आम आदमी पार्टी भद्रावतीच शिष्टमंडळ व मल्हारी बाबा सोसायटी इथल्या नागरिकांना घेऊन मुख्य अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना भेट दिली व सांगितले की त्या विद्युत डी.पी ला स्थानांतर करण्यात यावे,

अन्यथा काहीही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कोणतीही मानव हानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भद्रावती यांची राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आम आदमी पार्टी भद्रावती शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय भाऊ सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे, जी.बि हस्ते, पुष्पा हस्ते, जितेंद्र प्रसाद, संजूदेवी प्रसाद, प्रवीण ठोंबरे, निशा ठोंबरे, मुर्गेसन शेट्टी, पि.काकडे, सुरेश मोहनकर, कमलेश मोहमारे, राजेश यादव व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये