ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यमार्गावरील नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे !

सदर कामाची चौकशी करून कंञाटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती तालुक्यात भोयगाय-पाटण-परमडोली राज्यमार्गाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्याने हि कामे तातडीने करण्यासाठी संबंधित विभागाने तगादा लावला परंतु कामाच्या गुणवत्तेकडे त्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष झाल्याने कंञाटदार अंदाजपञकातील अटी व नियम धाब्यावर बसवून निकृष कामे करून बिले काढण्याच्या प्रयत्नात आहेत.माञ प्रशासनाने बिले देताना कामाची गुणवत्ता पाहून बिले काढावी अन्यथा कमिशनच्या नादात बिले काढून दिल्यास संबंधित विभागालाच धारेवर पकडू असा इशा ईशारा स्थानिक नागरिकांनाकडून होत असला तरी प्रशासनाचे अधिकारी काय करतात याकडे आता लक्ष लागले आहे.
सध्या शहरात सुरू असलेल्या शेडमाके चौक ते तहसील कार्यालय या मुख्य रस्त्यालगत चालू असलेल्या बंदिस्त सिमेंट नालीचे बांधकाम आर के चव्हाण या कन्ट्रॅकशन कंपनी मार्फत सुरू असून ते काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. त्या कामात निकृष्ट साहित्य वापरून निकृष्ट दर्जाचे काम जोमात सुरू आहे.एका बाजूची नाली बांधकाम झाले असून आता दुसऱ्या बाजुला नालीचे काम सुरू असताना जिवतीचे नगरसेवक अमर राठोड यांच्यासह काही स्थानिकांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आवाज उठवून बांधकामांची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.माञ प्रशासनाने त्या कंञाटदारावर कुठलिच कार्यवाही केली नाही.उलट आता दुसऱ्या बाजूने खोदकाम करून नालीचे बांधकाम केल्या जात आहे.वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बाधकांम विभाग याकडे दुर्लक्ष करित असल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नक्कीच कंञाटदाराकडून आपला खिशा गरम करून घेतला असावा असा अंदाज आणि अश्या चर्चाही जोरदार सुरू आहेत.

सदर त्या बंदीस्त नालीचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून करण्यात येत आहे. यामध्ये नाममात्र सिमेंट, रेतीच्या ठिकाणी मातीमिश्रित असलेला डस्ट, व कमी लोहा, गिट्टीचा वापर करण्यात येत आहे सदर बांधकाम सुरू असतांना बंदीस्त नालीचे काही ठिकाणी बांधकाम फुटत आहे तर या नालीच्या बांधकामात नालीतील बेड मुरूम भरून आणि सिमेंट दगडाचा वापर नकरता केली जात आहे. तर नालीची खोली आणि रुंदी देखील कमी करण्यात आली आहे. तर टक्केवारीमुळे या विकासाच्या कामांला ग्रहण लागल्याचे दिसत आहे, त्यामुळे संबंधित सार्वजनिक विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या सोबत संगणमत करून आपल्या खाऊगिरीमुळे स्वतः च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाच्या कामाचा गोरखधंदा राजरोसपणे जिवती शहरात सुरू आहे. त्यामुळे या बंदिस्त नालीच्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून अंदाजपत्रकानुसार काम करण्यात येत नसल्याने या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून सखोल चौकशी करावी. आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

दर्जाहिन कामाची चौकशी कोण करणार?

परिसरात सुरू असलेल्या राज्यमार्गावरील नाली बांधकाम असो पुलाचे बांधकाम असो किंवा रस्त्याचे काम या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचा अधिकारी नेमला असतो परंतु तो प्रशासनाचा अधिकारीच आपले उखळ पांढरे करून घेतला असेल चौकशी करणार कोण असा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये