ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अश्विनी वगारे (बोरकुटे) अर्थशास्त्र विषयात सुवर्णपदक

व्याहाड बूज. येथील सामाजिक कार्यकर्त्यातर्फे अश्विनी चे अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

      सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येथील अश्विनी प्रशांत वगारे – बोरकुटे ही विद्यार्थिनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून सत्र २०२४ च्या उन्हाळी परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात संपूर्ण गोंडवाना विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवण्याची मानकरी ठरली आहे . विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभात गडचिरोली येथे अश्विनीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.

    लहान पणापासून अत्यंत चाणाक्ष बुद्धिमत्तेची असलेली अश्विनी ही पेडगाव येथील रहिवासी असून तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण कापसी येथे झाले .सध्या ती व्याहाड बूज. येथील रहिवासी झालेल्या आहेत. विशेष म्हणजे अश्विनी ही घरी अभ्यास करूनच हे यश संपादन केलेले आहे.

      अश्विनीला मिळालेल्या या यशाबद्दल व्याहाड बूज.येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरनुले,सुनील बोमनवार, सचिन इंगुलवार,दिपक गद्देवार, योगेश निकोडे,हिम्मत मोटघरे, बंडू चिप्पावार,जयंत संगीडवार आबाजी चौधरी यांनी तिच्या घरी भेट देऊन अभिनंदन केलेले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये