गोंडवाना विद्यापीठस्तरिय सेपक टकरा स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलींच्या सेपक टकरा स्पर्धेत येथील सरदार पटेल महाविद्यालयाने सुवर्ण पदक तर मुलांच्या संघाने कास्य पदक पटकाविले आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन सेपक टकरा स्पर्धा विसपूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.
या सेपक टकरा स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजेते पद खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात वैष्णवी मेश्राम, गायत्री इटणकर, काजोल रापटण, शालिनी निर्मलकर, मुसकान शेख आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले. तसेच मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविले. तृतीय क्रमांक खेचून आणण्याकरिता मुलांच्या संघात जीत मंडल, पंकज बावरे, रवी राजभार, यश धकाते, सुमन सरकार, रोहित मंडल यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.
दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेडीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंत डभारे, आदित्य मंगरूळकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



