ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वप्नील मेश्राम यांना मराठवाडा विद्यापीठ, समाजकार्य महाविद्यालय छ. संभाजीनगर चा ‘नवक्षितिज वेध’ पुरस्कार जाहिर

१० मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार

चांदा ब्लास्ट

नावीन्यपूर्ण क्षेत्रकार्य आंतरक्रिया पुरस्कार या सदरात उल्लेखनीय क्षेत्रकार्य करणाऱ्या व समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालय छ. संभाजीनगर तर्फे नवक्षितिज वेध पुरस्कासाठी महाराष्ट्रातून ७० नामांकने प्राप्त झाली होती. क्षेत्रकार्यात उल्लेखनीय कार्यासाठी स्वप्नील मेश्राम याना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ४ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. १० मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणात शिक्षण घेत आहे.

एम. एस. डब्ल्यू प्रथम वर्षाचे क्षेत्रकार्य चंद्रपुरातील पर्यावरण प्रेमी बंडु धोत्रे यांच्या प्रसिद्ध इको – प्रो पर्यावरण संस्थेत सुरु झाले. चंद्रपूर शहरातील परकोट किल्ल्यांचे संवर्धन करणे या संस्थेचा मूळ उद्देश आहे. किल्ला स्वच्छता, नदी संवर्धन, पक्षी मित्र संमेलन , हेरिटेज वॉक व इतर उपक्रमात स्वप्नील ने सक्रिय क्षेत्र कार्य पूर्ण केले.

 एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षाचे क्षेत्रकार्य डॉ. किरण देशपांडे सायकॅट्रिक क्लिनिक आणि शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे सुरु झाले. या क्षेत्रकार्याअंतर्गत विविध मानसीक रुग्णांची केसहिस्ट्री जाणून घेणे, विविध आरोग्य शिबीर, विविध आरोग्य दिनाच्या रॅलीला उपस्थित राहून नेतृत्व करणे. क्षेत्रकार्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे निवेदन, संचालन करणे, कार्यक्रमाच्या बातम्या वृत्तपत्रात देणे असे विविध प्रत्यक्ष क्षेत्रकार्य स्वप्नील मेश्राम याने उत्तमरीत्या पार पाडले.

या व्यतिरिक्त स्वप्नील हा युवा कवी, साहित्यीक आहे. सूर्यांश साहित्य व संस्कृतिक मंच आणि इतर संस्थेत तो सक्रिय आहे.

या पुरस्कार निवडीसाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. जयश्री कापसे यांनी तसेच इतर सर्व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले आहे. या पुरस्काराचे श्रेय स्वप्नील ने महाविद्यालयाला दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये