ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिला शब्द केला पूर्ण…

मोठेपण पदात नसते ; तत्काळ कृती करण्यात असते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

सुधीरभाऊ मुनगंटीवार आमदार ५ तारखेला आंबेधानोरा येथे बंडू भाऊ मित्र परिवार तर्फे आयोजित महिला मेळावा व महिला सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यास उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी येताना आम्ही त्यांना सातारा तुकूम मार्गे येण्याची विनंती केली होती; मात्र ते पुढे निघून आल्याने डोंगरहळदी मार्गे आले. डोंगरहळदी ते उमरी या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व अत्यंत खराब झालेली अवस्था त्यांच्या निदर्शनास आली.

भाऊंनी आपल्या भाषणातही या रस्त्याचा मुद्दा ठळकपणे मांडला आणि आश्वासन दिले. विशेष म्हणजे केवळ आश्वासनावर न थांबता अवघ्या ८ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

यातून एका संवेदनशील नेत्याची जाणीव दिसून येते—लोकांना किती त्रास होत असेल याची तळमळ आणि छोट्या वाटणाऱ्या प्रश्नांनाही प्राधान्य देण्याची वृत्ती. मोठेपण पदात नसते, तर लोकांच्या अडचणी ओळखून त्यावर तत्काळ कृती करण्यात असते, हे भाऊंनी पुन्हा एकदा सिद्ध केले.

कालही भाऊंनी मोबाईलवरून गावकऱ्यांशी संवाद साधत, “मी तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढेन,” असा विश्वास दिला. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये