गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुगंधीत तंबाखू व गुटखा एकुण 3 लाख 91 हजारांवर मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          दिनांक 16/10/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथक पुलगाव डिव्हिजन परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की पंकज जयस्वाल रा.पुलगाव हा आपल्या घरी व दुकानात सुगंधीत तंबाखू बाळगून त्याची विक्री करीत आहे अशा माहिती मिळाल्याने सदर माहिती अन्नसुरक्षा अधिकारी वर्धा यांना देवुन आरोपी नामे पंकज रामलाल जयस्वाल वय 34 वर्ष रा. राठी गल्ली पुलगाव यांच्या वर सुगंधी तंबाखू संबंधाने रेड केली असता त्यांनी सदरची सुगंधित तंबाखू आरोपी नामे इमरान जब्बर खान वय 36 वर्ष रा.सुभाष नगर पुलगाव यांनी त्यांच्या कारने आणून दिल्याचे सांगितल्याने नमूद दोन्ही अटक आरोपीतांच्या ताब्यातून 1) वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधीत तंबाखू व गुटखा एकुण 34.35 किलो ग्राम किंमत 41,983/- रुपये, 2) एक हुंडाई एक्सेट चार चाकी कार किंमत 3,50,000/- रुपये.असा *एकुण 3,91,983/- रुपये चा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला. सदर नमुद दोन्ही आरोपीचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आले.

       सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउनि उमाकांत राठोड, प्र.शि लोहार अन्न सुरक्षा अधिकारी, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, विकास मुंढे, अरविंद इंगोले, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

   सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये