ईद ए मिलन समारंभात आमदार देवराव भोंगळे यांनी मुस्लिमाची मने जिंकली
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
रमजान ईद निमित्त राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार नामदार देवराव दादा भोंगळे यांनी जशने ईद ए मिलन समारोह स्थानीक महात्मा गांधी विद्यालय येथे आयोजित केला होता. समारंभाला शहरातील सर्व मस्जिद चे मौलाना मौजन सह सर्व पुरुष व महिला यांना निमंत्रित केले होते. सर्व मस्जिद कमिटी चे अध्यक्ष व पदाधिकारी यांना निमंत्रीत केले होते.त्याचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी स्नेहभोज देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या वेळी आमदारांनी विश्वास दिला की मी सदैव आपल्या सोबत आहो कोणतीही अडचण असल्यास मी आपल्यासोबत आहोत.मला कधीही फोन करा मी आपल्या समस्या सोडवण्यास सदैव तयार राहील आपला देश सर्व धर्म समभाव चे प्रतीक असून सर्वांनी एकमेकाला घेऊन चालणे ही खरी संस्कृती असून त्याला आपण खरे उतरू असे मनोगत व्यक्त केले,यावेळी रफिक निजामी यांनीही समाजाच्या व्यथा मांडल्या.
यावेळी मंचावर माजी सरपंच रऊफ शेख, सय्यद अबिद अली,सिराज जिलानी, शेख खाजा भाई, रजा मस्जिद कमिटी आदी उपस्थित होते.संचालन इम्रान पाशा शेख यांनी केले प्रास्ताविक रफिक निजामी व आभार मेहताब शेख यांनी मानले,या वेळी नांदा ,बीबी गडचांदुर येथील मुस्लिम नागरिक मोठ्या संखेने हजर होते.