ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी

मांगली शेत शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       वाघाने केलेल्या हल्ल्यात एक बैल गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मांगली शेत शिवारात दिनांक 17 रोज मंगळवारला सकाळच्या वेळेस घडली. यात बैल मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सदर घटनेची माहिती वनखात्याला कळविण्यात आली असून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बैल मालकाने केली आहे. मांगली येथील मारुती सलाम यांचे जंगल शिवारात शेत आहे. घटनेच्या दिवशी सकाळी त्यांचे बैल शिवारात चरत असताना जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला. यावेळी अन्य गुराखी जवळच उभे होते ते सुदैवाने या हल्ल्यातून बचावले. या गुराख्यांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने बैलाला सोडून पळ काढला.

यात बैलाच्या मानेवर व शरीरावर जखमा होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. सदर बैलाची किंमत 50 हजार रुपये एवढी असल्याचे बैल मालकाकडून सांगण्यात आले. शिवारातील वाघाच्या या वास्तव्याने गुराखी तथा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये