ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी समीर केने यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

संजय गांधी निराधार योजना समितीच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी समीर केने यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सदर समिती घोषित केली असून त्यात समितीच्या अध्यक्षपदी समीर केने तसेच सदस्य म्हणून किशोर मोहूरले सतीश कनकम मल्लेश कोडारी राजेश दासरवार,अनिल मोरे रूमदेव डेरकर, वैशाली जोशी लीना कुसराम प्रभृतींचा समावेश आहे. सदर समितीचे तहसीलदार हे पदसिद्ध सचिव आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये