ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे रोटरीचा पदग्रहण सोहळा संपन्न

नवनियुक्त अध्यक्ष पदी नगराध्यक्ष अनिल धानोरकर तर सचिव पदी सुधीर पारधी यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

मुलांना संस्कार देण्या करिता रोटरीने पुढाकार घ्यावा “बाॅक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष डाॅ.बी.प्रेमचंद” यांच आव्हान रोटरी क्लब च्या वतीने रोटरी क्लब च्या नवनियुक्त कार्यकारिणी चा पदग्रहण सोहळा सेलिब्रेशन सभागृह भद्रावती येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले.

सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून बाॅक्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डाॅ.बी.प्रेमचंद,भाविक तेलंग,डाॅ.माला प्रेमचंद, एजी डिस्ट्रिक्ट रमा गर्ग उपस्थित होते.

रोटरी क्लब भद्रावती च्या नवनियुक्त कार्यकारिणी मध्ये नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अध्यक्ष व सुधीर पारधी; सचिव तर कोषाध्यक्ष पदासाठी विक्रांत बिसेन यांची निवड करण्यात आली.तसेच डाॅ.माला प्रेमचंद, पुर्व अध्यक्ष, रोटरी क्लब भद्रावती यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करित पदभार सुपुर्द केला.

सोशल मिडिया च्या युगात लहानपणीच मुलांमध्ये शिस्त निर्माण झाली पाहिजे या करिता रोटरी च्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन बाॅक्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डाॅ.बी.प्रेमचंद यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना केले.

या वेळी उपस्थित सर्व रोटरी क्लब च्या सभासदांचे मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये