ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात स्वयंशासनाचा कार्यक्रम संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे ५ सप्टेंबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय नामदेवरावजी बोबडे सर उपस्थित होते. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.

तसेच याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे व सर्व शिक्षक वृंद शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या औचित्य साधून विद्यालयात आजचा दिवस विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी ही भूमिका स्वीकारून विद्यालयाचा संपूर्ण कारभार सांभाळाला. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालक सांस्कृतिक प्रमुख ज्योती चटप यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश मांढरे यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयातील सुरेश पाटील, माधुरी उंमरे श्रीमती सुषमा शेंडे, गोपमवार मॅडम, मरसकोल्हे सर, कोगरे सर,आत्राम सर,मेश्राम सर, बावनकर सर, वासेकर सर, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शशिकांत चन्ने, सुधाकर गेडाम, प्रेमचंद, लीलाधर मत्ते ,प्रभाकर पुंजेकर व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये