ताज्या घडामोडी

कर भरा अन्यथा जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करू – ग्राम सचिवांनी वेकोलीला ठणकावले

साखरी ग्राम पंचायतीने लावले वेकोली कार्यालयाला टाळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर

ग्राम पंचायत साखरी द्वारे वेकोलीच्या पोवनी-2 खाण प्रकल्पाला 15 कोटी 18 लाख 26 हजार 350 रुपयांचा मालमत्ता कर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 124 अंतर्गत ठोठावण्यात आला असुन ह्या करात डंपिंग ग्राउंड तसेच खाणीच्या भुभागाचा समावेश नाही. सदर कराची रक्कम भरण्यासाठी ग्रामपंचायतीने मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी पंचायत ह्यांच्या मार्गदर्शनात वारंवार पत्रव्यवहार करून सुचना दिल्या होत्या मात्र वेकोलिने ग्राम पंचायतीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

वेकोली वारंवार सदर करातून सूट देण्याची मागणी करीत असुन यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती मात्र दोन्ही बाजु ऐकुन घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेकोलीला कर भरण्याचे आदेश दिले. यासंदर्भात ग्राम सचिव वंदना माथनकर ह्यांचेशी चांदा ब्लास्ट ने संपर्क साधला असता अशा प्रकारची करमाफी देण्याचे कुठल्याही नियमात नसुन असे करणे बेकायदेशीर आहे. तसेच नियमानुसार वेकोलीने कारचा भरणा न केल्यास वेकोलीच्या मालमत्तेचा प्रसंगी लिलाव करून कराची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात येईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये