Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीय बजरंग दलाची नवीन कार्यकारिणी गठीत

भद्रावती तालुका अध्यक्ष पदी गौरव रुयारकर तर शहराध्यक्ष पदी स्वप्निल भोयर यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

     राष्ट्रीय बजरंग दलाची बैठक चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकातील कार्यालयात गुरुवारी दि. २८ नोव्हेंबर ला पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संपर्कप्रमुख नंदू गट्टूवार होते. अभिजीत स्वान महामंत्री आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर विभाग, सुयोग खटी विभागाध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल उपस्थित होते.

यावेळी संघटनेच्या विविध पदांवर नियुक्त्‌या करण्यात आल्या. यामधे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख रितेश विठ्ठल बुच्चे, विधानसभा महामंत्री अभय दिलीप दुर्गे तर भद्रावती तालुका अध्यक्ष पदी गौरव ऋषी रुयारकर, भद्रावती शहराध्यक्ष पदी स्वप्निल विजय भोयर यांची नियुक्ती

करण्यात आली. या नियुक्त्‌यांच्या निमित्ताने हिंदू ही आगे या सूत्रावर आधारित साप्ताहिक हिंदू केंद्र, त्रिशूल दीक्षा आणि सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी विविध उपायांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी व कार्यकत्यांनी उत्स्फूर्त योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये